बालविवाह झालेल्या गावातल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा राज्य महिला आयोगाचा इशारा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतरच्या काळात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे यापुढं बालविवाह होणाऱ्या गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. याबद्दलचा प्रस्ताव आयोगानं राज्य शासनाला सादर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यावर त्या कुटुंबातून बालविवाह होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, हे विवाह रोखण्याची जबाबदारी त्या गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांची असून, ते आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले, तर त्यांना आपलं पद गमवावं लागेल असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.