राज्यात आतापर्यंत ७८ टक्के नागरिकांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लस
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार २ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ६ लाख ८० हजार ९५९ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लशींच्या मात्रांची एकूण संख्या १० कोटी ४७ लाख ९८ हजार ५२५ वर पोचली आहे. राज्यातल्या सुमारे ७८ टक्के नागरिकांना लस मिळाली आहे. यापैकी ७ कोटींहून अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली असून तर सुमारे साडे तीन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.