Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांच्या याचिकेवर सुनावणी करणार नाही – सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा कळत नाही तोपर्यंत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. भ्रष्टाचार आणि खंडणीच्या तक्रारींच्या प्रकरणात संरक्षण मिळावं यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. संजय कौल, एम एम सुंद्रेशयांच्या खंडपीठानं हा आदेश दिला आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची एक याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. सीबीआयचा प्राथमिक तपासअहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी त्यांनी यामध्ये केली होती. या तपासातकुठलेही पुरावे मिळाली नाही, असा त्यांचा दावा होता.

Exit mobile version