देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे – एम. वेंकय्या नायडू यांच मत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व नागरिकांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांची गरज आहे, असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. ते काल हैदराबाद इथल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या उद्घाटनानंतर बोलत होते. मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांनी ग्रामीण भागातही आरोग्य केंद्र उभारायला पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं त्यांनी कौतूक केलं. यावेळी कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे उपराष्ट्रपतींनी आभार मानले.