Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी नवे संयुक्त बँक खाते उघडण्याची गरज नसल्याची केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी सध्याचे संयुक्त बँक खाते पुरेसे असून नवीन संयुक्त बँक खाते उघडण्याची गरज नसल्याचं निवृत्तीवेतन खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. कुटुंबातल्या सदस्यांनी सध्या अस्तित्वात असलेल्या संयुक्त बँक खात्याची निवड केली तर बँकांनी त्यांना नकार देऊ नये, असे आदेश सिंग यांनी बँकांना दिले आहेत. कुटुंब निवृत्तीवेतन लगेच सुरू व्हावे, त्यात कुठलेही अडथळे येऊ नये यासाठी संयुक्त बँक खात्याची गरज आहे. यासाठी कमीत कमी कागदपत्र लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version