पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी :- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
Ekach Dheya
मुंबई : पुणे – इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भूसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या (आर्बिट्रेटरच्या) निवाड्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दतात्रय भरणे यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुणे -इंदापूर या महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दतात्रय भरणे बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव, पुणेचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच उपसचिव श्री.कुलकर्णी, ॲड. शीतल चव्हाण उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन भुसंपादनाबाबत शेतकऱ्यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे. या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव यांनी भूसंपादित शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारीवर तसेच प्राधिकरण करत असलेली कार्यवाहीची माहिती या बैठकीत दिली.