Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र

मुंबई (वृत्तसंस्था) : पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज जालना इथं बातमीदारांशी बोलत होते. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत होती, त्यानुसार पाचवी पासून पुढच्या शाळा सुरु झाल्यानं  मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे, आणि या वयोगटातली कोरोना रुग्णसंख्या १ हजार ७११ नं  वाढल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचं मत असल्याचंही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

Exit mobile version