भारतमाला योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६५ हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती पूर्ण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६५ हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती पूर्ण झाल्याची माहिती परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते काल भविष्यासाठी भारताचे सशक्तीकरण या विषयावर आयोजित चर्चासत्रात दूरदृश्य प्रणाली मार्फत बोलत होते. २०२५ पर्यंत २ लाख किलोमीटर लांबीचे महामार्ग निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरित महामार्ग योजनेअंतर्गत स्थानिक लोकांच्या सहभागातून महामार्गांलगत वृक्षारोपण केलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.