राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देश संरक्षणात साहसी कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या गलवान क्षेत्रात ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान बलिदान देणाऱ्या संतोष बाबु यांना मरणोत्तर महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. सुभेदार संजीव कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. नायब सुभेदार नुदुराम सोरेन,हवालदार के. पलानी, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना मरणोत्तर वीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आलं.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समारंभाला उपस्थित होते.