Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बेकायदेशीररित्या बायोडिझेल विक्री करणाऱ्या कारखान्यावर नाशिक पोलिसांची कारवाई

मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीररित्या बायोडिझेल तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याअंतर्गत, सिन्नरजवळ असलेल्या ओम साई या कारखान्यात छापा टाकून पंचवीस लाख 99 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या एका टँकरची तपासणी केली असता त्यात बायोडिझेल असल्याचं आढळलं. त्यामुळे अधिक चौकशी केली असता या कारखान्यानं फर्निश ऑईल तयार करण्याचा परवाना घेऊन प्रत्यक्षात बेकायदेशीररीत्या बायोडिझेलचे उत्पादन आणि विक्री करत असल्याचं आढळले. याप्रकरणी कारखान्याचे मालक रमेश कानडे तसेच अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

Exit mobile version