ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीउमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीउमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. या निर्णयाअंतर्गत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. कोवीड मुळे प्रशासकीय आव्हानं आणि अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित राहावं लागू नये यासाठी, महानगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठीही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद ३१ डिसेंबर२०२२ पर्यंत वाढविण्यास आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली.