ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराग अग्रवाल यांची निवड
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला असून त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ट्विटर कंपनीत काम करत असलेले अग्रवाल यांच्याकडं सध्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदाची जबाबदारी आहे. डोर्सी यांनी 2006 मध्ये ट्विटर कंपनीची स्थापना केली होती. त्यांच्याकडं या कंपनीसह स्क्वेअर या वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीच्याही मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी होती.पराग अग्रवाल हे मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे, म्हणजे आयआयटीचे विद्यार्थी आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचं नेतृत्व करणाऱ्या भारतीय वंशाच्या तंत्रज्ञांमध्ये आता सुंदर पिचाई आणि सत्य नाडेला यांच्याबरोबर पराग अग्रवाल यांचाही समावेश झाला आहे.