देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमे अंतर्गत आतापर्यंत एकूण १२४ कोटी १० लाखापेक्षा जास्त लसमात्र देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. देशात काल ८० लाख ९८ हजारापेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लस मात्रा देण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यात आतापर्यंत ११ कोटी ४३ लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्यातल्या ४ कोटी २१ हजाराहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे तर ७ कोटी ४३ लाखाहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. देशात काल कोरोनाचे ८ हजार ९ शे पेक्षा जास्त नवे रुग्ण नोंदवले गेले. सध्या देशात ९९ हजार २३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षीच्या जूननंतर पहिल्यांदाच उपचाराधीन रुग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी झाली आहे. देशात काल १० हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले. काल एकूण २६७ नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.