देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सांगितलं
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऊर्जेची अतिरिक्त मागणी, आयात कोळश्यावर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून कमी वीज निर्मिती, पावसामुळे कोळसा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणी यामूळे ५ ऑक्टोबर रोजी ७ पूर्णांक २ दशलक्ष टन असलेला कोळश्याचा साठा आता १६.७४ मेट्रिक टनावर गेला असून हा साठा नऊ दिवसांसाठी पुरेसा असल्याचं जोशी यांनी सांगितलं.