Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नोव्हेंबर महिन्यात जी.एस.टी द्वारे १ लाख ३१ हजार ५२६ कोटी कर जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी.एस.टी.अर्थात वस्तू आणि सेवाकरापोटी नुकत्याच संपलेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये जी.एस.टी. लागू झाल्यानंतरचं आजवरचं सर्वाधिक दुस-या क्रमांकाचं कर संकलन झालं आहे. नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवाकराद्वारे १ लाख ३१ हजार ५२६ कोटी कर जमा झाला. सलग दुसऱ्या महिन्यात जी.एस.टी.च्या माध्यमातून १ लाख ३० हजार कोटींहून अधिक कर जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा हे कर संकलन २५ टक्क्याहून जास्त आहे. या महिन्यात आयात  महसुलात ४३ टक्क्यांनी तर स्थानिक व्यवहारात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारच्या विविध धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णयामुळे महसुलात वाढ झाल्याचं मत अर्थ मंत्रालयानं व्यक्त केलं आहे.

Exit mobile version