Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद साधेपणा व विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: देशाचे दोन वेळा राष्ट्रपती व घटना समितीचे अध्यक्ष राहिलेले डॉ.राजेंद्र प्रसाद हे साधेपणा व विनम्रता या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीला शिकवल्यास त्यातून उत्तम नागरिकांची पिढी तयार होईल,  असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

 डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भोजपुरी पंचायत’ या मासिकातर्फे भोजपुरी दिवस व डॉ राजेंद्र प्रसाद जयंती‘ समारंभाचे गुरुवारी (दि.२) राजभवन येथे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते. 

 कार्यक्रमाला पार्श्वगायक उदित नारायण, ‘अभियान‘ संस्थेचे अध्यक्ष अमरजित मिश्राभोजपुरी पंचायतचे संपादक कुलदीप श्रीवास्तवप्रो.जयकांत सिंह  तसेच भोजपुरीसाहित्यसिनेमा व समाजसेवा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. राजेंद्र प्रसाद इंग्रजीचे उत्तम जाणकार होते तरी देखील ते व्यक्तिगत जीवनात  भोजपुरी भाषेच्या वापराबाबत आग्रही होते. प्रज्ञावानभाषाप्रेमीसंस्कृतीप्रेमीश्रद्धावान व संघर्षशील असलेले डॉ.राजेंद्र प्रसाद  महात्मा गांधी यांचे प्रमाणेच प्रातःस्मरणीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

 डॉ. राजेंद्र प्रसाद यांना प्रिय असलेल्या  भोजपुरी भाषेत अधिकाधिक साहित्य निर्माण करणे ही त्यांना श्रद्धांजली ठरेलअसे राज्यपालांनी सांगितले. सुरुवातीला राज्यपालांनी डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.         

यावेळी भोजपुरी साहित्यसिनेमासमाजसेवा व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी उदित नारायणडॉ.आझम बदर खानअभय सिन्हाप्रो जयकांत सिंहआनंद सिंहअंजना सिंहलाल बाबू अंबिकालाल गुप्तालोकेश सोनीअमरजित मिश्रा व रत्नाकर कुमार शास्त्री यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उदित नारायण यांनी यावेळी भोजपुरी गीत सदर करून उपस्थितांची मने जिंकली.

Exit mobile version