Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही – मनसुख मांडविया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान फेटाळून लावला. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले की, याविषयी पंजाब वगळून इतर अनेक राज्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या उत्तरांनुसार ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. पंजाबमध्ये मात्र यासंबंधीची चार संशयित प्रकरणं आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेच्या मुद्द्याला नाहक राजकीय वळण दिलं जात आहे. यावेळी कोविड१९च्या दुसऱ्या लाटेच्या काळात देशाच्या ऑक्सिजन उत्पादन क्षमता आणि संबंधित व्यवस्थेत मोठी वाढ झाली असंही मांडवीय यांनी यावेळी सांगितलं.

Exit mobile version