‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये १२५ मागास तालुक्यातल्या महिला बचतगट आणि अनुसूचित जाती जमातीचं सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये, या प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी काल वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही विशेष योजना राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. ही विशेष योजना महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासींचे वन-घन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.