देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज – अमित शहा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सहकार चळवळ मुळापर्यंत रुजवण्यासाठी ‘सहकार विद्यापीठ’ उभारण्याची गरज आहे, असं गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हंटल आहे. एखादी संस्था असं विद्यापीठ उभारण्यासाठी उत्सुक असेल तर त्याचा विचार केला जाईल, असं त्यांनी आज लोकसभेत लिखित उत्तरात म्हंटलं आहे. ‘सहकार से समृद्धी’ ही संकल्पना राबवण्यासाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरु केलं आहे, असंही शाह एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.