देशातल्या विमानतळांची संख्या येत्या ४-५ वर्षात अडीचशेवर जाणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ४-५ वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या २५० पर्यंत जाणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत दिली. उडाण योजनेअंतर्गत केवळ लहान शहरांना हवाई वाहतुकीशी जोडण्यात आलं नाही तर ६३ विमानतळं आणि हेलिपोर्ट्स उभारण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होऊन १३० झाल्याचं ते म्हणाले. हिंदूस्थान एअरनॉटिक्सनं ३६ आसनी क्षमता असलेल्या ८० विमानांची निर्मिती केल्याचंही लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान त्यांनी सांगितलं.