Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे प्रमुख, संस्था आणि खासगी क्षेत्रातले प्रतिनिधी उपस्थित होते. आपल्या भाषणात मोदी यांनी, 75 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक झाल्याची आठवण सांगितली. भारतीय संस्कृतीच्या मूल्यांमधूनच लोकशाहीचा उगम झाला असल्याचं ते म्हणाले. कायद्याचा आणि वैविध्यपूर्ण जीवन पद्धतींचा आदर हा भारतीयांचा स्वभावच असून विदेशांमध्ये स्थायिक झालेले भारतीयही या मूल्यांचं पालन करत त्या त्या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत, असं मोदी म्हणाले. जगभरातल्या सर्व लोकशाही देशांनी त्यांच्या राज्यघटनांमध्ये असलेल्या मूल्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.

Exit mobile version