ओमायक्रॉन विषाणूची लक्षणं सौम्य मात्र संसर्गाचं प्रमाण डेल्टापेक्षा जास्त असल्याची आरोग्य संघटनेची माहिती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा या प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य असून कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारकता कमी करायला सक्षम आहे, मात्र या प्रकाराची लक्षणं सौम्य आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डेल्टा या प्रकारामुळे जगभरात अनेक जण संक्रमित झाले होते. प्रामुख्यानं दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेऊन जगातल्या अनेक राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत, तसंच आपापल्या देशात कोरोना विषयक नियम अधिक कठोर केले आहेत. ९ डिसेंबरपर्यंत ओमायक्रॉनचा फैलाव ६३ देशांमध्ये झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.