Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लसमात्रांची एकूण संख्या १३३ कोटी ९० लाखाच्या वर गेली होती. आज सकाळपासून २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. महाराष्ट्रात काल १० हजार ४६० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ७ लाख ५४ हजार ९४४ नागिराकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांना दिलेल्या लसमात्रांची एकूण संख्या १२ कोटी ४५ लाख ३८ हजाराच्या वर गेली. त्यात ४ कोटी ६६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

Exit mobile version