५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातल्या मुक्तियोद्ध्यांना देशाची आदरांजली
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातले मुक्तियोध्ये आणि विरांगनांना त्यांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जवानांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. १९७१ च्या युद्धात आपण दमनकारी शक्तीचा पराभव केला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आजच्या दिवशी राष्ट्रपती ढाक्यात उपस्थित असणं प्रत्येक भारतीयांसाठी विशेष महत्वाची बाब आहे असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजय दिन हा भारतीय सैनिकांच्या धैर्य आणि पराक्रमच प्रतीक आहे. विजय दिनाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आपण शूर योध्यांना आदरांजली अर्पण करत आहोत असं शहा यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. १९७१ मध्ये आजच्या दिवशी भारतीय सैनिकांनी शत्रूचा प्रभाव करून मानवी मूल्य जपण्याच्या परंपरेत उल्लेखनीय कार्य केल्याचं शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय सशस्त्र दलानं १९७१ च्या युद्धात केलेलं समर्पण आणि पराक्रम आजही देशवासीयांच्या समरणात आहे. भारतीय सशस्त्र दलाचा आणि त्यांच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वर्णीम विजय दिनानिमित्त ट्विट संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.