राज्यात काल कोविड १९ च्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : काल राज्यात ओमायक्रॉन बाधित ८ रुग्ण आढळले. त्यातले ४ रुग्ण मुंबईतले, ३ सातारा जिल्ह्यातले, तर १ पुण्यातला रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी २८ जणांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडलं, असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. राज्यात काल कोविड १९चे ८०४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९६ हजार ७३३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ८५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ४८ हजार ६९४ झाली आहे. काल ११ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ३४० झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. राज्यात सध्या सहा हजार ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.