Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची आज अंतिम फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय वंदे भारतमच्या नृत्य उत्सवाची अंतिम फेरी आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू क्रिडांगणाच्या प्रेक्षागृहात  होत आहे. देशाच्या 4 भागातील 949 नर्तकांचा समावेश असलेले 73 समूह या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. अंतिम फेरीतल्या विजेत्यांना पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. सांस्कृतिक राज्य मंत्री मीनाक्षी लेखी, संरक्षण आंनी पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट तसंच मंचीय कलाक्षेत्रातील विविध मान्यवर आज होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी वंदे भारतम या विशेष प्रस्तुतीसह अनेक नृत्य रचना सादर करण्यात येतील. संरक्षण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयानं आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत याअभिनव कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

Exit mobile version