Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिवसेना भोसरी विधानसभेची पिंपरीत संवाद सभा उत्साहात संपन्न

पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हतबल झाल्यासारखे दिसतात. परंतु, आपले मनोबल जराही खचू न देता संयमाने, निष्ठेने व जिद्दीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पक्षाने संधी दिल्यास या मतदार संघाचा कायापालट करण्याची क्षमता आपल्यात आहे. शिवसैनिक ही माझी ताकद व उर्जा आहे. ह्याच ताकदीच्या व उर्जेच्या जोरावर मी सर्वसामान्य माणसांची लढाई लढतोय, समोर कोण उभा आहे, याची मी पर्वा करत नाही, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख व शिवसेना कामगार नेते इरफाभाई सय्यद यांनी केले.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारण्यासाठी मतदारसंघातील विविध ठिकाणी भोसरी-खेड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख व शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या संवाद सभेच्या निमित्ताने पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासाठी इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
भोसरी मतदारसंघातील जाधववाडी-कुदळवाडी, नेहरूनगर-मासुळकर कॉलनी या विभागातील शिवसैनिकांसाठी शुक्रवारी (दि. १३) रोजी पिंपरीत तसेच, शनिवारी (दि. १४) रोजी शाहुनगर, चिंचवड येथे रुपीनगर, त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, चिखली, कृष्णानगर, पूर्णानगर, शिवतेजनगर, घरकुल या विभागातील तसेच रविवार (दि. १५) रोजी चर्होली येथे मोशी, डुडुळगाव, चर्होली, दिघी, भोसरी या विभागातील सर्व शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकाऱ्यांसाठी या संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संवाद सभेच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट हे होते.
यावेळी सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही संवाद सभा महत्त्वाची राहणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हतबल झाल्यासारखे दिसतात. परंतु, आपले मनोबल जराही खचू न देता संयमाने, निष्ठेने व जिद्दीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. राज्यात आपले सरकार आहे. कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेले अपयश विसरून जावे. नेहमीच शिवसेनेची ताकद या मतदारसंघ राहिली आहे. शहरपातळीपर्यंत पक्षाचा विस्तार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही हे पक्षश्रेष्ठीवर सोडावे. हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यास आपणाला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल. पक्षाला आणखी बळकट करण्यासाठी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर सदस्य नोंदणी करावी. पक्षाची सभासद नोंदणी सुरू आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोहिमेअंतर्गत सभासद नोंदणी करावी, असे सांगून कार्यकर्त्यांनी निराशा व मरगळ झटकून नव्या उत्साहाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. पक्षाने संधी दिल्यास या मतदार संघाचा कायापालट करण्याची क्षमता आपल्यात आहे. शिवसैनिक ही माझी ताकद व उर्जा आहे. ह्याच ताकदीच्या व उर्जेच्या जोरावर मी सर्वसामान्य माणसांची लढाई लढतोय, समोर कोण उभा आहे याची मी पर्वा करत नाही. विरोधी पक्षाच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडून, राज्यात शिवसेनेचे सरकार येईल, यासाठी सेनेचा उमेदवार निवडून आणावा व त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही सय्यद यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केली.
भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले की, पूर्वीपासून हा मतदारसंघ शिवसेनेचाच राहीलेला आहे. इथून शिवसेनेचा आमदार निवडूनही गेलेला आहे. त्यामुळे शिवसेनेने भोसरी विधानसभा मतदारसंघावर दावा सांगिलेला आहे. परंतु, मतदारसंघ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेऊन, हा मतदार संघ शिवसेनेकडेच राखतील, यात दुमत नाही. मी व सुलभाताई उबाळे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून माघार घेतलेली आहे. शिवसेनेकडून भोसरी विधानसभेसाठी इरफान सय्यद हे इच्छूक असणं, हे शिवसेनेच्या बळकटीचेच उदाहरण असल्याचेही आल्हाट यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास शिवसेना सहसंपर्क प्रमुख व शिवसेना कामगार नेते इरफाभाई सय्यद, जिल्हा संघटीका सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, मा. नगरसेवक किसन (महाराज) तापकीर, महिला आघाडी वेदश्री काळे, उपशहर प्रमुख नेताजी काशीद, युवराज कोकाटे, संघटक सर्जेराव भोसले, अनिल सोमवंशी, समन्वयक दत्तात्रय भालेराव, सतीश दिसले, सतीश मरळ, प्रदीप सपकाळ, योगेश बोराटे, योगेश जगताप, विलास पवार, विश्वनाथ टेमगिरे, रामदास गाढवे, अंकुश जाधव, महिला आघाडी रुपाली आल्हाट, गौरी घंटे, अक्षदा शेळके, शुभांगी थोरात, मनीषा परांडे, सविता गायकवाड, आशाताई भालेकर, विजया (मामी) जाधव, सुरेखा हुले, वर्षा भालेराव, युवा सेनेचे रुपेश कदम, कुणाल जगनाडे, सचिन सानप, कुणाल तापकीर, अमित शिंदे, ग्राहक मंचचे गणेश जाधव सर्व जेष्ठ शिवसैनिक, मार्गदर्शक दिलीप सावंत, कैलास नेवासकर, सुरेश कदम, अशोक जाधव, शरद हुले, महादेव गव्हाणे, शंकर घंटे, बंदावणे तसेच सर्व शाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी शिवसेना सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व आदी उपस्थित होते.
Exit mobile version