Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओमिक्रॉन विषाणू कमी घातक असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करणं धोकादायक ठरेल-जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकारापेक्षा ओमिक्रॉन या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्गाचा वेग असून दोन्ही लशी घेतलेल्यांनाही त्याची बाधा होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी दिला.

कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं आढळून आलं आहे, असंहि त्यांनी सांगितलं. संसर्ग वाढत असल्यानं, ओमिक्रॉन हा कमी घातक असल्याचं समजून त्याकडं दुर्लक्ष करणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. नाताळच्या सुट्यांचा काळ सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे.

Exit mobile version