Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही – वर्षा गायकवाड

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला त्या उत्तर देत होत्या. तांत्रिक कारणामुळे कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये, यादृष्टीनं इयत्ता ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ३ मार्चपर्यंत, तर १५ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन अर्ज १४ मार्चपर्यंत भरण्याची मुभा देत असल्याचं गायकवाड यांनी घोषित केलं.

Exit mobile version