Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यासह देशभरात नाताळ उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळचा सण आज साजरा केला जात आहे. राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देखील नाताळनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण सेवा, दया आणि विनम्रता यांचं महत्त्व सांगणारी असून, सर्वांना आरोग्य आणि समृद्धी मिळावी अशा शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटरवर संदेशात दिल्या आहेत.सर्व चर्च विद्युत रोषणाई, आकर्षक सजावट, ख्रिसमस वृक्ष आणि सांताक्लॉज यांनी सजली आहेत. रात्रीच्या ख्रिस्त जन्मानंतर आज सकाळी चर्चमध्ये प्रार्थना घेऊन हा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

गोव्यातही नेहमीप्रमाणे नाताळचा उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. देश-विदेशातले पर्यटक इथं नाताळ तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी जमले आहेत. चर्चमधील प्रार्थना आणि कॅरोल्समुळं वातावरण भारुन गेलं आहे. बेंबीक आणि दॉदॉल या गोव्याच्या खास पारंपरिक खाद्यपदार्थांना नाताळमध्ये विशेष स्थान आहे.

Exit mobile version