कोविडच्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने दुबईहून मुंबईविमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संयुक्त अरब अमिरातीहून येणाऱ्या मुंबईकरांना आगमनानंतर सात दिवस घरी आणि त्यानंतरचे सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात रहावं लागेल.सातव्या दिवशी प्रवाशाची RT-PCR चाचणी होईल. त्याचा रिपोर्ट नकारात्मक असल्यास प्रवाशाला स्वयंनिरीक्षणात ठेवण्यात येईल. रिपोर्ट सकारात्मक आल्यास संस्थात्मक विलगाकरण अनिवार्य करण्यात आलं आहे.