Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत १५-१८ वयोगटातल्या मुलांना लस घेण्यासाठी १ जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. कोविन अॅपचे प्रमुख डॉ. आर.एस. शर्मा यांनी ही माहिती दिली. प्रत्येक मुलाकडे आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र नसण्याची शक्यता आहे, त्यामुळे  या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून, ‘विद्यार्थी’ अशी नवी वर्गवारी कोविनवर टाकली असल्याचंही त्यांनी सांगितलं. या नोंदणीच्या वेळी सहव्याधी आहे किंवा नाही याबाबतही माहिती द्यावी लागेल, आणि लस घेतांना नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेलं सहव्याधीचं प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात सादर करावं लागेल.६० वर्षांवरच्या नागरिकांनी लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील, आणि या दुसऱ्या मात्रेनंतर नऊ महिने पूर्ण झाले असतील तर ते लसीच्या वर्धक मात्रेसाठी पात्र असतील असंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version