नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही – नरेंद्रसिंह तोमर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हे कायदे मागं घ्यायचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. नागपूरमध्ये याविषयी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास असल्याचं तोमर यांनी सांगितलं.