Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कानपूर दीक्षांत समारंभात प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत म्हणजेच पूर्ण स्वतंत्र भारत  आहे, आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हा असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोडीन यांनी आज IIT  कानपूरच्या विद्यार्थ्यांना दिला. प्रधानमंत्री आय आय टी कानपूरच्या 54 व्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित होते. या समारंभात विद्यार्थ्याना संस्थेत विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल पदवी प्रदान करण्यात आल्या. अशा प्रकारचा दीक्षांत समारंभ भारतात प्रथमच झाला. आय आय टी कानपूरच एक वेगळं स्थान आहे,तुम्ही या संस्थेतून ज्ञान घेऊन बाहेर पडत आहेत यात तुमच  र्तसेच तुमचे पालक आणि  गुरुचं हि स्थान आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.   आज तंत्रज्ञानाच युग आहे. विना तंत्रज्ञानं आजच जग अपूर्ण आहे,तुम्ही इथे जे तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे, IIT नं तुम्हाला जी शक्ती दिली आहे त्यातून स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. पुढच्या २५ वर्षांनी देशाची कमान तुम्हाला सांभाळायची आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले. सरकार तुमच्या पाठीशी कायम राहील, असं आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्याना दिल. उत्तर प्रदेशातल्या कानपूर मेट्रो रेल्वे, तसंच बिना पंकी मल्टीमोडल पाईपलाईन प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पूर्ण झालेला विभाग हा आय आय टी कानपूर ते मोती झील असा 9 किलोमीटर लांबीचा आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11 हजार कोटी पेक्षा जास्त खर्चाचा असून, त्याची लांबी 32 किलोमीटर आहे. बिना पाईपलाईन प्रकल्पाची क्षमता 34 लाख 50 हजार मेट्रिक टन प्रती वर्ष इतकी असून, त्यामुळे बिना रिफायनरी मधून पेट्रोलियम उत्पादनं मिळायला मदत होणार आहे.

Exit mobile version