राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश टोपे
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत दिली. आरोग्य विभागाकडून मूलभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे पुरवणे त्याचप्रमाणे रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही केली जात आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.