कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशाने १४३ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं काल १४३कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसभरात देशात ५७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं कळवलं आहे. देशात आजच्या दिवशी दुपारपर्यंत लसींच्या २७ लाखाहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरात १४३ कोटी ४६ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ५९ कोटी १० लाखाहून अधिक जणांना लसींच्या दोन्ही मात्रा मिळल्या आहेत. महाराष्ट्रातही आत्तापर्यंत १३ कोटी २२ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ५ कोटी २४ लाखाहून अधिक जणांना लसींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.