कोरोनाच्या ओमीक्रॉन आणि डेल्टा प्रकारांची काही दिवसात त्सुनामी येण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या एकाच वेळी होणाऱ्या फैलावामुळे कोविड १९ च्या रूग्णांची संख्या त्सुनामीच्या मोठ्या लाटेसारखी झपाट्यानं वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. रूग्णांची संख्या वाढल्यामुळे रूग्णालयांमधली गर्दी आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण आणखी वाढणार असल्याचं संघटनेचे महासंचालक टेड्रो घेब्रेयसस यांनी काल वार्ताहरांना सांगितलं. अमेरिका आणि युरोपातले देशात कोविड रूग्णसंख्येत होत असलेल्या विक्रमी वाढीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हो इशारा दिला आहे. सर्व देशांनी लसींच्या न्याय्य वाटपावर भर दिला पाहिजे या मताचा त्यांनी पुनरूच्चार केला. २०२२ च्या मध्यापर्यंत प्रत्येक देशानं ७० टक्के लसमात्रा द्यायचं उदि्दष्ट पूर्ण करावं यासाठी संघटना मोहीम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.