19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतला अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची पडझड झाली. सादिशा राजपक्षा याला वगळता श्रीलंकेच्या आघाडीच्या कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही. सामन्यात ३३ षटकांचा खेळ झाल्यावर पावसाला सुरुवात झाल्यानं खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत श्रीलंकेनं ३३ षटकांमध्ये ७ गडी बाद ७४ धावा केल्या होत्या. भारताच्या विकी ओत्सवाल यानं ३, कौशल तांबे यानं २ तर रवी कुमार आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता. पावसामुळे थांबलेला खेळ अद्याप पुन्हा सुरु झालेला नाही.