अमरावतीमध्ये कापसाला विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावतीत खाजगी बाजारात काल नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी विक्रमी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला जिल्ह्याच्या इतिहासातला हा सर्वाधिक दर ठरला आहे. विदर्भातलं प्रमुख पीक म्हणून कापसाकडे पाहिलं जातं. यावर्षी अतीवृष्टानं, तसंच काही भागात बोंड अळीच्या प्रादुर्भावानं कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे विक्रमी भाव मिळूनही शेतकऱ्यांना उत्पन्न पुरेसं मिळण्याबाबत खात्री नाही. याबाबत सचिन बारवाव या शेतकऱ्यानं सांगितलं.