महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य वेगानं विकास करु शकेल- एम व्यंकय्या नायडू
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य विकासाच्या इंजिनात परिवर्तित होऊ शकेल, असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केरळात व्यक्त केलं. ते संत कुरियाकोस ऊर्फ चवारा यांच्या दीडशेव्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. संत चवारा यांनी १९ व्या शतकात केरळी समाजाचा सर्वांगीण विकास केला, त्यांनी समाजातल्या सर्व घटकांसाठी शाळा सुरू केल्या तसंच या शाळांमधे माध्यान्ह भोजनाची कल्पना राबवल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यावेळी उपस्थित होते.