Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

मुंबई :  मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. ‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून ही योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार आहे.

पुस्तकांचे गाव भिलार येथे विविध साहित्यिक उपक्रम, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, साहित्य जत्रा, मान्यवर साहित्यिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कार्यवाही राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

पुस्तकांचे गाव भिलार या योजनेच्या व्यवस्थापनासाठी राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत एकूण 7 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

Exit mobile version