“बर्ड्स ऑफ कोल्हापूर” च्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापुरातल्या कळंबा परिसरात “बर्ड्स ऑफ कोल्हापूर” यांच्यावतीनं झालेल्या पक्षिगणनेमध्ये एकशे एक जातींच्या १ हजार ३४ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वीस स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. धोका पातळीजवळील वर्गवारीमधल्या इंडियन रिव्हर टर्न, पैंटेड स्टोर्क तसंच असुरक्षित यादीमध्ये असणारा टॉनी इगल, ब्लॅक बेलीड टर्न, वूली नेक स्टोर्क या पक्ष्यांचीही नोंद झाली आहे. कोल्हापूर इथल्या बर्ड्स ऑफ कोल्हापूर ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून पक्षिगणना घेण्यात करत असल्याचं पक्षी निरीक्षक प्रणव देसाई यांनी सांगितलं.