२६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी प्रधानमंत्र्यांची घोषणा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहिबजादे, अर्थात गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्राच्या पराक्रमाला अभिवादन करण्याकरता २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रकाश पर्वाच्या दिवशी केली आहे. साहिबजादा झोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी धर्मतत्त्वांचं पालन करायला सर्वोच्च प्राधान्य देत त्याकरता भिंतीत जीवंत गाडलं जायची शिक्षा पत्करली. कधीही अन्याय सहन न करायची, तसंच सर्वसमावेशकता आणि एकोपा राखायची त्यांची ही शिकवण जगाला प्रेरणा आणि जगण्यासाठी बळ देते, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.