Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे.अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांबरोबरच बाजारपेठांमधे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कलिंगड आंबा, काजू पिकांचे ही नुकसान झाले आहे. रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस आणि गारांनी जनजीवन विस्कळीत केलं आहे.राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी चिखलदऱ्याला पर्यटकांचा ओघ सुरुच आहे. मात्र सध्या चिखलदऱ्याच्या सौंदर्यावर धुक्याची चादर निर्माण झाली आहे. मेळघाटातल्या कोलकास सेमाडोह हरिसाल चिखलदरा मोथासह संपूर्ण मेळघाटावर सध्या चं आच्छादन आहे यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी पर्यटक मात्र या वातावरणाचा आनंद घेत असल्या३चं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.सातारा शहर आणि परिसरात आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, वातावरण सध्या ढगाळ आहे.

Exit mobile version