आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं – राज्यपाल
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडत आहेत, देशाला आणखी पुढं नेण्यासाठी आपली मातृभाषा आणि मातृभूमी याबाबत आपल्या कर्तव्याची जाण ठेवून कार्य करायला हवं, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सतराव्या दीक्षांत समारंभात ऑनलाइन बोलत होते. सोलापूर एक औद्योगिक शहर आहे, त्यामुळे या शहरातल्या उद्योगांना सोबत घेऊन विद्यापीठानं नवे अभ्यासक्रम सुरु करावेत, त्याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार मिळू शकतील. तसंच नवीन स्टार्टअप निर्माण होऊ शकतील, असं ते म्हणाले. यावेळी ऑनलाइन पद्धतीनं एकूण १२ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. याचबरोबर ६२ विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी, तर ५५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं मिळाली. ऑफलाईन पद्धतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं तर चार विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.