Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रसिद्ध लेखक प्रकाशक अरुण जाखडे याचं पुण्यात निधन

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते ६५ वर्षांचे होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. मराठी प्रकाशक परिषदेचे ते अध्यक्ष होते. बालवाडमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशन सुरु करुन अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. याशिवाय जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवादही प्रकाशित केले आहेत. त्यात अगाथा खिस्ती यांची ‘हर्क्यूल पायरट मालिका’, पाउलो कोएल्हो यांची ‘द अलकेमिस्ट’ आणि ‘द जहीर’ ही पुस्तकं, टोनी मॉरिसन यांचं ‘बिलव्हड’ हे पुस्तक, जीन पॉल सार्ट्रे यांचे ‘ली मॉट्स’ आणि सिमोन दी बोवा यांचं ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत होते.

Exit mobile version