Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दुबईतल्या जागतिक प्रदर्शनातल्या MSME दालनाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (वृत्तसंस्था) : दुबईत आयोजित जागतिक प्रदर्शनातल्या एमएसएमई दालनाचं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून आभासी पद्धतीनं केलं. खादी आणि ग्रामोद्योग महामंडळानं तयार केलेल्या ‘खादी इंडिया’ या चित्रपटाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. रोजगार निर्मितीमधे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रानं उल्लेखनीय भूमिका बजावली आहे, तसंच कारखानदारीचा पाया विस्तारला आहे, असं राणे यांनी यावेळी सांगितलं. सध्या या क्षेत्रात सहा कोटीपेक्षा जास्त युनिट्स असून त्याद्वारे ११ कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. भारताच्या आर्थिक वाढीत उल्लेखनीय योगदान हे क्षेत्र देत आहे. निर्यात, उत्पादनाचा दर्जा, स्थुल राष्ट्रीय उत्पादनातलं योगदान या सर्व निकषांवर या उद्योगांना नव्या उंचीवर पोचवण्यासाठी लक्ष्य तयार करण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याकडेही सरकार लक्ष देत आहे, असं राणे यांनी सांगितलं.

Exit mobile version