‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांची मुलाखत
Ekach Dheya
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
मुंबईतील कोरोनाची सध्याची परिस्थिती, नागरिकांचे लसीकरण, युवकांचे लसीकरण, ऑक्सिजन पुरवठा, हॉस्पिटलमधील खाटांचे व्यवस्थापन, लहान मुले व पालकांनी घ्यावयाची काळजी आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. गोमारे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.