Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ओमायक्रॉन विषाणू धोकादायक उत्परिवर्तनं घडवू शकतो – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीचा धोका संपल्यात जमा असल्याचं समजू नये असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेडरॉस घेब्रेसस यांनी दिला आहे. जीनिव्हा इथं काल ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारच्या रुग्णांची वाढ वेगानं झाली आहे, हे लक्षात घेता आणखी धोकादायक उत्परिवर्तनं घडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं या विषाणूवर सातत्यानं लक्ष ठेवणं गरजेचं झालं आहे, असं ते म्हणाले. युरोपातल्या काही देशांमधे ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूचा प्रसार प्रचंड वेगानं झाल्याचं दिसून आलं या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. जगभरात गेल्या आठवडाभरात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले पावणे २ कोटींहून अधिक रुग्ण आढळले. ओमायक्रॉन संसर्गाची लक्षणं सरासरीपेक्षा सौम्य वाटली तरी हा आजार निरुपद्रवी असल्याचं समजू नये, असं सांगून ते म्हणाले की अनेक रुग्णांचा मृत्यू ओढवला असून, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे.

Exit mobile version