कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण
Ekach Dheya
SRINAGAR, JUN 15 (UNI) Jammu and Kashmir (UT) Health workers in a unique drive conduct tests and vaccinate shopkeepers in business hub Lal Chowk to control the surge of COVID-19 cases in Kashmir valley on Tuesday. UNI SRN PHOTO 9.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडप्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९ कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. सुमारे ९२ लाख लोकांना पहिली तर ६६ लाख ६२ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना दुसरी मात्रा मिळाली आहे. ५६ लाख ५५ हजारांहून अधिक जणांची वर्धक मात्रा घेऊन झाली आहे. १५ ते १८ वयोगटातल्या पावणे ४ कोटी मुलामुलींनी कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की, काल दिवसभरात ७६ लाख ३५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्यात आली. देशभरात काल कोविडचे २ लाख ८२ हजार नवे रुग्ण आढळले. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ लाख ३१ हजार झाली आहे. काल दिवसभरात एक लाख ८८ हजार रुग्ण कोविडमधून बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णाक ८८शतांश झाला आहे. आतापर्यंत साडे ३ कोटींहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण ८ हजार ९६१ रुग्ण देशात आढळले असून आतापर्यंत ७० कोटी ७४ लाख कोविड चाचण्या झाल्या आहेत.